टीम मंगळवेढा टाईम्स ।
रड्डे येथे जनावरे विकत घेण्यासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. २० मार्च रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोन्ही गटांच्या ९ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णदेव थोरबोले, देवकते, एकनाथ देवकते, सागर देवकते , सत्यवान थोरबोले , ज्ञानू पाटील आणि आरोपी लक्ष्मण कोळेकर , नितीन कोळेकर , विठ्ठल कोळेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
विठ्ठल कोळेकर व शिवाजी देवकते यांनी फिर्याद दिली आहे शिवाजी विठ्ठल कोळेकर हे मुलगा लक्ष्मण व नितीनसह कृष्णदेव थोरबोले यांच्यासोबतचा एक लाख रुपयांचा वाद मिटविण्यासाठी मुलाणी वस्तीवर गेले होते.
तेथे गावातील प्रतिष्ठित वाद मिटवताना संशयितांनी त्यांना काठीने, दगडाने मारहाण केली. तसेच प्रतिष्ठीतांनी भांडण सोडवल्यावर तिघेही निघाले होते.
जाताना संशयितांनी केबल, गज , चाकू , टॉमीने कोळेकर यांच्या पत्नीसह चौघांना मारहाण केली . तसेच पत्नीच्या गळयातील सोन्याचे गंठण, मोबाईल, पॉकेट गहाळ झाले.
तर दुसऱ्या घटनेत शिवाजी देवकते हे मेव्हणे कृष्णदेव थोरबोले यांनी यांनी दिलेल्या पैशाचा वाद मिटविण्यासाठी मुलाणी वस्तीवर गेले होते. तेथे वाद मिटला नाही.
त्यानंतर संशयितांनी त्यांना कोयत्याने , दगडाने मारून गंभीर जखमी केले . शिवीगाळ , दमदाटी केली.
याप्रकरणी दोन्ही गटांनी पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानंतर दोन्ही गटांच्या नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हेडकॉन्स्टेबल सुनील गायकवाड तपास करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज