टीम मंगळवेढा टाईम्स ।
शासनाच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन नूतन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
मंगळवेढा तहसील कार्यालयाचा पदभार त्यांनी नुकताच स्वीकारला असून शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गेजगे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर भंडगे, माजी नगरसेवक बापू अवघडे, नंदेश्वर येथील धोंडीबा बंडगर, नंदेश्वर विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य नानासाहेब बंडगर, संतोष रणपिसे इत्यादी उपस्थित होते.
तहसीलदार पुढे बोलताना म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयाकडून न्याय मिळेल, दिलासा मिळेल असा विश्वास निर्माण करण्याबरोबरच
गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज