टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात मागच्या दोन आठवड्यांपासून कुठे पाऊस तर कुठे उन्हाच्या झळा बसत आहेत.
मागच्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वादळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस पुन्हा होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. अशी परिस्थितीत पुढचे पाच असण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
आज राज्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.
याचबरोबर मराठवाड्यातही असाच पाऊस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात होणार आहे.
कोकणात वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत तर मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर तर विदर्भात बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ याभागात यलो अलर्ट असणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच पारा 42 अंशांच्या पार गेला आहे. वादळी पाऊस हजेरी लावत असतानाच उन्हाचा चटका आणि उकाडा असह्य होत आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसासह, गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
तर उर्वरित राज्यातही वादळी पावसाचा इशारा असून, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान राज्यात मागच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपूरी येथे 42 अंश सेल्सिअस, तर जळगाव, सोलापूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, धुळे येथे तापमान 41 अंशांच्या पुढे होते. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून 36 ते 40 अंशांच्या दरम्यान होते.
नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर पूर्व विदर्भापासून, मराठवाडा, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत.
या पूरक स्थितीमुळे आज राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज