मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
उजनी धरणातून शेतीसाठी कालवा व बोगदा यातून आवर्तन सुरू झाले असून, मंगळवारी (दि. १७ मार्च) मुख्य कालव्यातून एक हजार ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
भीमा सीना जोड कालव्यातून (बोगद्यातून) आगामी दोन दिवसांत ९५० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी दिली.

मागील पंधरवड्यात भीमा नदीत पाणी सोडून नदीवरील सर्व सतरा बंधारे भरून घेतले आहेत. तसेच बोगद्यात पाणी सोडून सीना नदीतील बंधारे पण भरून घेतले आहेत.

परंतु, सीनेच्या बंधाऱ्यातील पाणी आता कमी झाले असल्यामुळे यापुढे पुन्हा यामध्ये पाणी अडवण्यासाठी बोगद्यातून पाणी सोडण्यात येत आहे.

कालवा आणि बोगदा या दोन्ही ठिकाणचे आवर्तन यापुढे ४५ ते ४८ दिवस चालू राहणार असून, एप्रिल २६ अखेरपर्यंत पाणी चालू राहील, असे धरण नियंत्रण विभागाकडून कळवण्यात आले आहे.

सीना माढा सिंचन योजनेतून ३१५ क्युसेक विसर्गाने, तर दहिगाव (करमाळा) सिंचन योजनेतून १०० क्युसेक विसर्ग मागील एक महिन्यापासून सुरू आहे. सर्वत्र उन्हाळ्याची उष्णता वाढत असल्यामुळे उजनी लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे.

उजनी उजव्या कालव्यावरून १२६ किलोमीटर अंतरापर्यंत, तर डाव्या कालव्यावरून १२२ किलोमीटर अंतरातील एकूण ९ लाख ५० हजार एकर लाभक्षेत्राला हे पाणी मिळणार आहे.

सीना माढा सिंचन योजनेवरून माढा तालुक्यातील ४० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येत आहे.

उजनीची सद्य:स्थिती
उजनी जलाशयात सध्या २४.६६ टीएमसी एकूण पाणीसाठा असून, ३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सोलापूर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यांतील शेतीसाठी अनेक उचल पाणी घेणाऱ्या संस्था तसेच

शेतकऱ्यांच्या वैयक्तिक संस्था, वीज निर्मिती केंद्रे, साखर कारखाने, अनेक लहानमोठ्या उद्योगधंद्यासाठी व लहान तसेच मोठ्या पाणीपुरवठा योजनांसाठी जलाशयातील पाण्याचा वापर होत आहे. टक्केवारी ५६.९४ टक्के आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












