टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरानजीक एका मंगल कार्यालयात होणारा बालविवाह पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळला असून, त्या अल्पवयीन मुलीच्या आई – वडिलांचे समुपदेशन करून मुलीस सोलापूर येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मंगळवेढा शहरानजीक सांगोला रोडवर असलेल्या एका मंगल कार्यालयात एकूण सात विवाह होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामध्ये एक बालविवाह होत असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने पोलीस निरीक्षक रणजित माने यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली.
ही माहिती मिळताच माने यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, पोलीस हवालदार महेश कोळी, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ माने, खंडाप्पा हत्ताळी आदींचे पथक पाठवून बाल विवाहाबाबत खातरजमा केली.
विवाहामध्ये १७ वर्षे ९ महिन्यांची मुलगी तर २२ वर्षीय सांगोला येथील मुलगा यांचा विवाह १२ वाजून २५ मिनिटांनी होत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अल्पवयीन मुलीस व तिचे आईवडील, मुलाचे आईवडील यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे समुपदेशन करून बालविवाह कायद्याविषयक जनजागृती करून मनाचे परिवर्तन केले.
१८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलीचा विवाह करणार नसल्याची लेखी स्पष्टोक्ती दिल्यानंतर अल्पवयीन मुलीस महिला पोलिस शिपाई सुवर्णा मोरे यांनी सोलापूर येथील बाल सुधारगृहात दाखल केल्याचे सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज