टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतीपंप सुरू कराना अचानक विजेची तार तुटून अंगावर पडल्याने विजेचा धक्का बसल्याने एकाचा मृत्यू झाला. तर तो न परतल्याने त्याला शोधताना तारेच्या स्पर्शाने विजेचा धक्का बसून वडील जखमी झाले.
बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास शिरभावी येथील घोरपडे वस्तीवर ही दुर्घटना घडली.
अस्लम लालासाहेब पठाण (वय ४२) असे मृत्यू झालेल्याचे तर लालासाहेब हसीम खान पठाण (रा.घोरपडे वस्ती, शिरभावी) असे जखमीचे नाव आहे.
अस्लम हे पहाटे पाचच्या सुमारास शेतीपंप सुरू करण्यास गेले होते तेव्हा अचानक विजेची तार तुटून अंगावर पडल्याने विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.
मुलगा का येईना म्हणून लालासाहेब हे तेथे गेले. तेथे पडलेल्या विजेच्या तारेचा त्यांच्या पोटाला स्पर्श झाल्याने त्यांनाही विजेचा धक्का बसला. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अस्लम हे शेतीसह गवंडीकाम करत होते. त्यांच्या पश्चात आई , वडील , पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
त्याच्या अचानक निधनाने शिरभावी गावावर शोककळा पसरली. याप्रकरणी त्यांचे चुलते आसीम खान बंडूलाल पठाण (रा.खर्डी, ता.पंढरपूर) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यावरून पोलिसांत नोंद केली आहे . पोलिस तपास करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज