टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षापासून बंद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा उघडला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना विशेष कार्याधिकारी म्हणून नियुक्ती करत मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली आहे.
मूळ संकल्पक असणारे मंगेश चिवटे यांची नियुक्ती झाल्याने या कक्षांतर्गत राज्यात रुग्णसेवेला अधिक गती मिळणार आहे.
राज्यात २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी
ही संकल्पना मांडली.
आणि तातडीने देवेंद्र फडणवीस यांनी हा कक्ष सुरू केला. चिवटे यांच्या या संकल्पनेचे आणि त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९ रोजी हा कक्ष बंद करण्यात आला. हा कक्ष पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी चिवटे यांनी प्रयत्न केले.
त्यास प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिवटे यांची कक्षाच्या विशेष कार्याधिकारीपदी नियुक्ती केली.
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून राज्यातील रुग्णांना २४ तास सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे अभिवचन मंगेश चिवटे यांनी दिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज