मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी वारीला महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो. तर कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. मात्र यावर्षीपासून यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

शिक्षण मंत्री दादा भुसे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंदिर प्रशासनास केलेल्या सूचनेनुसार यंदा पासून महापूजेत जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. यामुळे यंदा पासून कार्तिक वारीला नवी प्रथा सुरू होणार असून याची इतिहासात नोंद होणार आहे.

कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच यात्रा तयारीचा आढावा घेण्यात आला. शिक्षण मंत्री दादा भुसे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

या बैठकीला पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान आवताडे, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांचे सह सर्व अधिकारी आणि वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते. याच बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी ही सूचना मंदिर प्रशानाच्या समोर ठेवली.

यावेळी दादा भुसे यांनी, आषाढी वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो. तर कार्तिकी वारीच्या महापूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांचा असतो.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच जो प्रथम वारकरी असतो त्याला देखील या महापूजेचा मान मिळतो. पण यंदा पासून यात एक महत्वाचा बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

त्यांनी, बैठकीला येतानाच मंत्री प्रताप सरनाईक एक सूचना मांडली. वारकऱ्यासोबतच जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना देखील या महापूजेमध्ये सहभागी करून घेता यावे अशी विनंती त्यांनी केली. याबाबत आता शासन स्तरावर विचार सुरू झाला तसा प्रस्ताव मंदिर प्रशासनाकडे दिल्याचे दादा भूसे म्हणाले.
दोन्ही मंत्र्यांच्या या सूचना जर मंदिर प्रशासनाने स्विकारल्या तर एक नवीन प्रथा यंदापासून सुरू होणार आहे. पण अद्याप याबाबत मंदिर समिती आणि प्रशासनाने कोणताच निर्णय घेतलेला नाही. तर याबाबत कोणता निर्णय होतो याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या महापूजेवरून देखील चर्चांना उधान आले असून दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला संदी मिळणार असा सवाल अनेकांना पडला आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाला कार्तिकी वारीच्या महापूजेचा मान मिळणार? कोणाच्या हस्ते महापूजा होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

यावर विधी व न्याय विभागाने मार्गदर्शन करताना कार्तिकी वारीच्या महापूजेचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. यामुळे यंदाची कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची महापूजा एकनाथ शिंदे करतील. ती पुढील महिन्यात रविवारी 2 नोव्हेंबर रोजी असेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














