मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
शेतकरी सेनेच्या सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी सलगर बुद्रुक येथील गावचे माजी उपसरपंच व प्रगतशील शेतकरी रामचंद्र जाधव यांची निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या शिवसेना शेतकरी सेनेच्या निवडी मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे पार पडल्या.
सोलापूरच्या शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी सलगर बुद्रुक ता मंगळवेढा येथील गावचे माजी उपसरपंच व प्रगतशील शेतकरी रामचंद्र जाधव यांची निवड करण्यात आली.
मुंबई येथे बाळासाहेब भवणामध्ये राज्यभरातील शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
शेतकरी सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष धनंजय जाधव यांनी रामचंद्र जाधव यांना सोलापूर जिल्हा शेतकरी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली व त्यांचा सत्कार केला.
दरम्यान गेल्या 5 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना पक्षातर्फे शेतकरी सेनेची स्थापना केली होती.राज्यभरातील शेतकऱ्यांना या शेतकरी सेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पध्द्तीच्या समस्यांची सोडवणूक करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा,
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालाला राज्य व देश पातळीवर योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी,अश्या एक ना अनेक प्रकारची मदत शिवसेना शेतकरी सेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केली जाणार असल्याची माहिती शिवसेना शेतकरी सेनेचे राज्य प्रदेश अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिली.
दरम्यान रामचंद्र जाधव यांच्या या निवडीमुळे भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत तसेच सलगर परिसरातील शेततकऱ्यांकढुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज