मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा व पंढरपूर मतदारसंघामध्ये ग्रामीण रुग्णालयास निधी मिळावा यासाठी नागराज ज्ञानेश्वर व्हनवटे या सलगरच्या सुपुत्राने 29 सप्टेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. त्यास आज मूर्त स्वरूप प्राप्त होऊन शासनाने निधी मंजूर केला असल्याची माहिती नागराज व्हनवटे यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पंढरपूर, सांगोला या तालुक्यात कष्टकरी, कामगार, हातावर पोट असणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कायमच अंगमेहनतीचे काम करणारे हे कामगार वैद्यकीय उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय यात दाखल होऊन उपचार घेतात.
पण काही उपचारांच्या करिता त्यांना सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात पाठवले जाते. मंगळवेढा – पंढरपूर, सांगोला येथील बहुसंख्य रुग्ण हे सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल होतात.
सोलापूर जिल्हा ते मंगळवेढा – पंढरपूर, सांगोला हे अंतर खूप लांब आहे त्यामुळे येथील नागरिकांना सोलापूर जिल्हा रुग्णालय येथे जाण्यासाठी खूप त्रास होतो. मंगळवेढा पंढरपूर येथे सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालय (सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल) उभारण्यात यावे अशी मागणी अनेक दिवसापासून येथील जनतेची मागणी होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले होते की, मंगळवेढा – पंढरपूर, सांगोला तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या करिता मंगळवेढा व पंढरपूर यांच्या मध्यवर्ती भागाजवळच चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालय (सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल) सरकारच्या पंतप्रधान स्वास्थ सुरक्षा योजनेअंतर्गत
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने लवकरात लवकर सुरू करून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आपण स्वतः लक्ष घालून सोडवण्यात यावा याकरिता सदर निवेदनाच्या माध्यमातून आपणास विनंती करण्यात येत आहे असे पत्र 2022 साली नागराज व्हनवटे यांनी दिली होते.
मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालयास 99 कोटी 60 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री ना.प्रा.डॉ.तानाजी सावंत, यांचेकडे पाठपुरावा केला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज