मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
राज्याचा अर्थसंकल्प येत्या दोन दिवसात सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
या अर्थसंकल्पात २०२६-२७ साठी अनेक आर्थिक तरतूदी केल्या जातील. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते.

अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
लाडकी बहीण योजनेसाठी २०२६-२७ साठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. वर्षभरासाठी निधी किती लागणार, याबाबत घोषणा केली जाते.

लाडकी बहीण योजनेत मागच्या वर्षी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी हा निधी वापरण्यात येणार होता. त्यानंतर आता पुढच्या २०२६-२७ साठी निधीची घोषणा केली जाईल.

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी, कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेतले जाऊ शकतात.

याचसोबत लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.लाडकी बहीण योजनेचा निधी २१०० रुपये करण्याची घोषणा केली होती.
मात्र, आता दोन वर्ष उलटून गेले तरीही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात निर्णय होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














