टीम मंगळवेढा टाईम्स
मंगळवेढा येथील सुरसंगम ग्रुप ,मंगळवेढा
म्युझिक क्लब व स्व्.संजय -सविता सार्वजनिक् वाचनालय यांचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त
आज सोमवार दि. 20 फेब्रुवारी सायंकाळी 5.30 वाजता श्री गणेश बाग येथे छत्रपतींच्या शूर मर्दानो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सुर संगम ग्रुपचे कलावंत प्रेरणादायी गीते सादर करणार असून या कार्यक्रमात मंगळवेढा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या आजी माजी अध्यक्षांचा मंडळासाठी योगदान दिल्याबद्दल सपत्निक् सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारक समिती ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती ,
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती , महात्मा बसवेश्वर पुतळा पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती
आणी श्री गैबिपीर उरुस कमिटी च्या प्रमुखांचा ही सत्कार मानपत्र देऊन करण्यात येणार असुन या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे,
मंगळवेढा म्युझिक क्लबचे अध्यक्ष लहू ढगे व स्व.संजय- सविता सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज