टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे
मंगळवेढेकरांना या दिवाळीत आता 100 टक्के शुद्ध तेल सर्व आजारांना दूर ठेवणारे व केमिकल फ्री असे शेंगदाणा, करडई व सूर्यफूल तेल आता होलसेल दरात घरपोच मिळणार आहे.
तुमच्या हृदयाचे व शरीराचे स्वास्थ टिकवण्यासाठी मंगळवेढा येथील सचिन शिंदे यांनी भाळवणी-हाजापूर रोडवर घाण्यावरील खाद्यतेल निर्मितीची मिल ‘अमृतधारा’ या नावाने सुरू केली आहे.
सुमारे सात प्रकारच्या तेलांची निर्मिती ते करतात. शुद्ध व नैसर्गिकरीत्या उत्पादित खाद्यतेलांची मागणी लक्षात घेऊन या मिल ची स्थापन करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या तेल बियांपासून नैसर्गिक तेल तुमच्या समोरच एका तपास काढून दिले जाणार आहे.
तेलबिया घेऊन या, तुमच्या समोरच तेल अल्प दरात काढून घेऊन जा
तुमच्या तेलबिया घेऊन या व तुमच्या समोरच त्याचेच तेल घेऊन जा असा उपक्रम सुरू केला आहे. शेंगदाणे, सूर्यफूल व करडई यांचे तेल अल्प दरात काढून देण्यात येईल असे संचालक सचिन शिंदे यांनी सांगितले.
सध्याच्या काळात आयुर्वेदिक, सेंद्रिय, नैसर्गिक अशा शब्दांचे महत्त्व वाढू लागले आहे. ग्राहक आरोग्याबाबत अत्यंत जागरूक झाल्यानेच तो अशा उत्पादनांची मागणी करू लागला आहे. काळाची हीच गरज शिंदे यांनी ओळखली.
तुम्हाला माहित आहे का ?
• कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी
• रक्त संचलन करण्यासाठी
• शरीरातील मासपेशींचा विकास करण्यासाठी.
• मोनो सेचुरेटेड फॅटस् ने समृद्ध
• ट्रान्स फॅट्स विरहीत हृदय आरोग्यासाठी उत्तम
• रोगप्रतिकारक क्षमता वाढवते हृदयविकार दूर करण्यासाठी उपयुक्त
• सर्व प्रकारचे त्वचा रोग टाळण्यासाठी
• या तेलामध्ये प्रथिने, जीवनसत्व ड व कॅल्शियम असते
तेल घरपोच मिळण्यासाठी व अधिक माहितीसाठी येथे करा संपर्क
सचिन शिंदे – भाळवणी-हाजापूर रोडवर भाळवणी मोबाईल : 7559347935 / रविराज मोरे : 8380871010 या नंबर वरती संपर्क करून आपण अधिक माहिती घेऊ शकता.
घाण्याचे शुध्द तेल वापरा आजारांना दुर करा..!
रिफाइंड तेलात हृदयविकारासाठी कारणीभूत असलेल्या घटकांचा समावेश असतो. त्यामुळे जिथे घाण्याचे तेल उपलब्ध असते, तेथील नागरिकांनी शक्यतोवर हेच तेल वापरण्याचा सल्ला हृदयविकार तज्ज्ञांनी दिला आहे.
हृदयासाठी चांगले घाण्याचे तेल
घाण्याच्या तेलात ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असते, जे हृदयासाठी चांगले असते. यात निसर्गतःच तेलात मिळणारे जीवनस्त्व आढळतात. त्यामुळे घाण्याचे तेल खाणे अधिक फायद्याचे ठरते, असा सल्ला आहारतज्ज्ञ यांनी दिला आहे.
तेल बियांपासून तेल काढून मिळेल
मंगळवेढा तालुक्यात पहिल्यांदा तेल बियांपासून तेल काढणे सोपे झाले आहे. फक्त एका तासात तेल काढून मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची व वेळेची बचत होत आहे.
कॉल्ड प्रेस ऑइल मशीन मुळे शुद्ध, नैसर्गिक तेल मिळते
आमच्याकडील कॉल्ड प्रेस ऑइल मशीन मुळे शुद्ध आणि नैसर्गिक स्वरूपात तेल मिळते हे तेल आठ ते नऊ महिन्या पेक्षा जास्त काळ टिकते. रिफाइंड तेल खाण्यापेक्षा शुद्ध आणि नैसर्गिक तेल खा व निरोगी राहा.
अमृतधारा घाण्याचे शुद्ध नैसर्गिक वैदिक तेल हे ग्राहकांना पाच लिटर आणि त्यापेक्षा जास्त मागणीस घरपोच सेवा मिळेल. त्याचबरोबर करडई, शेंगदाणा व सूर्यफुलाचे तेल तात्काळ काढून मिळेल.
अल्प दरात पेंड उपलब्ध
नागरिकांना व शेतकऱ्यांना आता अत्यंत अल्प दरात करडई, शेंगदाणा व सूर्यफूल पेंड उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रिफाइंड तेलाचे दुष्परिणाम
रिफाईंड तेलामुळे मानवी शरीरास कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते त्यामुळे हृदयविकार रक्तदाब वजन वाढणे यासारखे आजार होतात
रिफाइंड तेलामध्ये कृत्रिम रंग पाम तेल आणि इतर केमिकलची भेसळ असते हे आरोग्यास घातक आहे
आपल्या उत्तम आरोग्यासाठी एक वेळ आमचे तेल वापरून पाहा
आपल्या शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे त्या अनुषंगाने आमचे तेल पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवलेला आहे.
घाण्याच्या शुद्ध तेलाचे फायदे
१.घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते.
२. शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारचे प्रोटिन्स असतात. तो सुगंध त्या प्रोटिन्सचाच असतो.
३. शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स सुद्धा असतात.
४. शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लिपोप्रोटीन (H.D.L) हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ल्यामुळे तयार होतो. म्हणूनच आहारात शुद्ध तेल आवश्यक असावे.
५. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाही.
६. हार्ट अटॅक, किडनीचे आजार, कॅन्सर, डायबेटिज, सांधेदुखी, पॅरालिसिस, ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.
७. भारतात शेकडो वर्षांपासून घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायुषी होते. १०० वर्षांच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते.
८. घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान ४० ते ४५ सेल्सिअसपेक्षा जास्त नसते त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात.
९. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे, आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवणारे घाण्याचेच शुद्ध तेल खावे.
तसंच एक मोठा गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये आहे की, शेंगदाण्याच्या तेलाने कोलेस्ट्रॉल वाढते हे चुकीचे आहे . उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे H.D.L. वाढते आणि हेच H.D.L. आपल्या शरीरात अत्यंत आवश्यक असते .
शेंगदाणा, करडई,तीळ, जवस, मोहरी, खोबरेल ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी करडईच्या बिया अमृतधारा घाण्याचे शुद्ध नैसर्गिक वैदिक तेल भाळवणी येथे घेऊन यावेत असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज