टीम मंगळवेढा टाईम्स।
निवडणुकीत बनावट जातीचा दाखला देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर ग्रामपंचायतच्या माजी महिला सरपंच
राजश्री औदुंबर कोळी (रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सन २०२०-२१ मध्ये वडापूर ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक झाली.
यावेळी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजश्री कोळी यांनी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे महादेव कोळीचे २७ मे १९९१ रोजीचा दाखला सादर केला होता.
पुणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून सदर दाखल्याची तपासणी करून घेतली असता तो बनावट असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात आदेश तहसीलदार यांना प्राप्त झाला.
त्यानुसार निवासी नायब तहसीलदार राजाभाऊ बाबू भंडारे (रा. कुमठा नाका, टीव्ही सेंटर जवळ, सोलापूर) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून
भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक काटे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज