टीम मंगळवेढा टाईम्स ।
सत्तास्थानावर अनेक वर्ष असतानाही सहकार शिरोमणीची अधोगती केली आहे. तरीही यापुढेही मते मागून सत्तेची हाव सुटत नाही. आपण विठ्ठलवर सत्तांतर केले मी करूनच दाखविले. यामुळे आपल्याच विठ्ठल परिवारातील या कारखान्याला प्रगतीकडे घेऊन जात असताना आपला विठ्ठल परिवारही एकसंघ राहील. याकरिता या निवडणुकीत परिवर्तन घडवा असे आवाहन विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.
या कारखाना उभारणीसाठी जवळपास २९हजार लोकांना सभासद या नात्याने पैसे घेतले आहेत. परंतु मतासाठी मात्र केवळ काही जवळच्याच लोकांना अधिकार देण्याचा प्रयत्न दिसत आहे. असे असतानाही त्यांचीही बिल मिळविण्यासाठी मागील अनेक वर्ष ससेहोलपट झाली आहे.
यामुळे करेक्ट ऊस बिल मिळविण्यासाठी आणि कामगारांना वेळेवर पगारी करून घ्यायची असतील तर आता परीवर्तन हाच ईलाज उरला आहे.
या कारखान्याच्या मदतीने स्वतःचा सीताराम कारखाना उभा केला होता. तो कारखानाही यांना नेटकेपणाने चालवायला जमला नाही. शेवटी तो कारखाना विकून हा सहकार शिरोमणी कारखानाही संकटात टाकला आहे. याबद्दल जाब विचारण्यासाठी ही मतदान सावध भूमिका घेऊन करणे गरजेचे आहे. असेही अभिजीत पाटील यांनी सांगितले.
विठ्ठल प्रमाणे सर्वकाही देण्याचा आजच शब्द देत असून काटामारीतून मुक्त होण्याची संधी घालवणार नाही अशी अपेक्षा अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आपण विठ्ठल चे देणी योग्य पद्धतीने दिली आहेत. यामुळे त्यांना आता बोलायला संधी उरली नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगोला आणि धाराशिव या कारखान्यावर बोलत असतील तर त्याचेही १००प्रमाणे दुसरा हप्ता तातडीने सुरू करणार असल्याचे जाहीर केले.
विठ्ठलचे पोळा बिल आताच वाटप सुरू केले असल्याचे सांगत. तुम्ही मात्र तुमचं मूळ एफ आर पी ची रक्कम निवडणूक असतानाही हालचाल करून भरू शकला नाही. यावरून तुमची पत काय उरली आहे. हे सभासद यांनी ओळखले असून या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले.यामुळे तुमची बिले मीच देणार हे मात्र मला तयारी करावी लागणार असल्याचे सांगत विजयाची खात्री दिली आहे.
विठ्ठल आणि सहकार शिरोमणी एकत्रितपने राहिल्यास मोठा खर्च वाचून मोठी प्रगती साधली जाईल. यामुळे परिवर्तन घडवून आपला विठ्ठल परिवाराची मान स्वाभिमानाने ताठ ठेवा असेही अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.
यावेळी डॉ.बी.पी.रोंगे सर, दिपक पवार, प्रा. तुकाराम मस्के, अमरजित पाटील, पांडुरंग ताठे, विष्णुभाऊ बागल, सचिन पाटील, रणजित बागल, सुधाकर सुरवसे यांच्यासह अनेकांनी सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी अनेकांनी अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केला.
आबाला आमदार करणे हेच आपले ध्येय : दामूआण्णा पवार
विठ्ठलचा चेअरमन विठ्ठल परिवाराचा नेता असतो. हा नेताच विधानसभा प्रमुख दावेदार असतो. हे फार वर्षापासून ठरलेलं गणित आहे. त्यानुसार आताही येणाऱ्या निवडणुकीत अभिजीत पाटील हेच आपल्या परिवाराचे उमेदवारही अन् आमदार ही होणार.
असे सहकार शिरोमणी चे माजी संचालक दामूआण्णा पवार यांनी सांगितले. विठ्ठल प्रमाणे या बिघडलेल्या कारखान्याचा कारभार सुधारणा पाहिजे असेल तर आता परिवर्तन करणे आवश्यक असल्याची पवार यांनी सांगितले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज