सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून पंढरपूर येथे चंद्रभागा नदी जवळील कुंभार घाटा नजिक नव्याने बांधण्यात आलेला घाट सहा जणांच्या अंगावर कोळसून यामुळे दगड माती खाली दबून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती.
या घटनेस कारणीभूत असलेल्या घाटाच्या कामाच्या ठेकेदारा विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांचा एकच आक्रोश होता. Six killed in ghat collapse on Chandrabhaga river at Pandharpur; Filing a crime against the contractor
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चंद्रभागा नदी लगत कुंभार घाट येथे घाट निर्मितीचा ठेका ठेकेदार अशोक भागवत इंगोले व हुले ए बी आय सह कन्स्ट्रक्शन बीड यांनी घेतला आहे. Construction Beed with Contractors Ashok Bhagwat Ingole and Hule ABI
त्या कामावर सुदीप गोपाल चमारिया (वय २०, रा. १०३ समृध्दी हेरिटेज जुळे, सोलापूर) व साक्षीदार हे देखरेख करत होते. Sudip Gopal Chamaria
त्यावेळी त्यांनी ठेकेदार अशोक भागवत इंगोले यांना घाट भिंतीचे उंची जास्त असलेने त्यांना आवश्यक सुरक्षा कठडे ,दर्शक फलक बोर्ड ,रेलिंग ग्रील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याबाबत व उर्वरित राहिलेले बांधकाम पूर्ण करणे बाबत लेखी व तोंडी सूचना देऊन ही त्यांनी त्यात हलगर्जीपणा केला आहे.
मंगेश गोपाळ अभंगराव (वय ३०), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय ७०), राधा गोपाळ अभंगराव (वय ६०, तिघे रा कुंभार घाट, पंढरपूर), संग्राम उमेश जगताप (वय १४ रा भडीशेगाव ता.पंढरपुर) व दोन अनोळखी महिला (वय अंदाजे ५५ ते ६०)यांच्या अंगावर घाट बांधकामाची भराव केलेले दगडे, चुना, माती, वाळू कोसळले. त्याखाली दबून त्यांचे सर्वांचे मृत्यू झाला.
तसेच घाट बांधकामाचे नुकसानीस कारणीभूत झाले. म्हणून ठेकेदार अशोक भागवत इंगोले व हुले ए बी आय सह कन्स्ट्रक्शन बीड यांच्याविरुद्ध भा.द.वि.क ३०४ (अ) ४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. शिवाजी करे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज