टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आगोदर ऊसदर (एफ.आर.पी) जाहीर करावा व मगच हंगाम सुरू ठेवावा.
तसेच मागील गळित हंगामांमधील थकीत ऊसबिल न देणाऱ्या साखर कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, शेतकऱ्यांना त्यांची थकीत ऊसबिले त्वरीत मिळावीत या मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
संघटनेच्यावतीने आज जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.सकाळी 9 ते 11 या वेळेत आंदोलन होणार असल्याची माहिती संघटेनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली.
या रोडवर होणार आंदोलन
सोलापूर ते मंगळवेढा रोडवर माचणुर ,पंढरपूर ते टेंभुर्णी रोडवर भोसेपाटी, सोलापूर ते पुणे रोडवर सावळेश्वर, कुर्डूवाडी ते बार्शी रोडवर रिधोरे, सोलापूर ते बार्शी रोडवर राळेरास, टेंभुर्णी ते नगर रोडवर जातेगाव, अकलूज ते सांगोला रोडवर मळोली, पंढरपूर ते कराड रोडवर महुद आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रूप या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
Chakkajam agitation of Swabhimani Shetkari Sanghatana in Solapur district today
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज