टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्यभर विविध आंदोलन चालू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने देखील आज दि.२६ जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले मराठा आरक्षण आघाडी सरकारच्या निक्रियतने गेले आहे, तसेच आता राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण देखील या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे संपुष्टात आल आहे.
गोरगरीब ओबीसी मध्ये येणाऱ्या विविध समाजातील राजकिय नेतृत्व संपण्याच्या डाव यामधून दिसून येत आहे. या विरोधात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे बुरकुल यांनी सांगितले.
आज दि.२६ जून रोजी मंगळवेढा येथील सोलापूर रोड वरील जुना टोल नाका चौकात सकाळी 10 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनासाठी जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे , जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण , जिल्हा चिटणीस संतोष मोगले, जिल्हा चिटणीस सिद्धेश्वर कोकरे , जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा चिटणीस हौसाप्पा शेवडे , शहराध्यक्ष गोपाळ भगरे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष सुधाकर माळी , भाजयुमो तालुकाध्यक्ष विठ्ठल सरगर , शहराध्यक्ष सुशांत हजारे , सुदर्शन यादव तसेच भाजपचे व ओबीसी समाजातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
सदरील आंदोलन हे पूर्ण .महाराष्ट्र राज्यात होणार आहे या आंदोलनासाठी पंढरपूर तालुक्याचे नेतृत्व आमदार प्रशांत मालक परिचारक हे करणार असून मंगळवेढा तालुक्याचे नेतृत्व आमदार समाधान आवताडे हे करणार आहेत अशी माहिती जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे.
तरी या आंदोलनासाठी समाजातील सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गौरीशंकर बुरकुल यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज