टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी वृक्षारोपण करून ऊस तोडणी व वाहतुकीचे काम करणाऱ्या कारखान्यावर मुक्कामी असणाऱ्या बैलगाडी मजुरांना थंडीपासुन बचावासाठी ब्लँकेट, फराळ वाटप कारखान्याचे व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने संचालक सचिन शिवशरण, कामगारांच्या वतीने पंडीत पाटील तसेच शिक्षण मंडळ मंगळवेढा चे सदस्य दिगंबर यादव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे संचालक सुरेश भाकरे, राजीव बाबर यांचेसह भारत निकम, उद्योजक अविनाश मोरे, प्र.कार्यकारी संचालक रमेश गणेशकर , वर्क्स मॅनेजर गणपत घाडगे , मुख्य शेती अधिकारी रमेश पवार , कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड ,
कामगार पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी , पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय पाटील , हेडटाईमकिपर आप्पा शिनगारे , ईडीपी मॅनेजर मनोज चेळेकर ,
बैलगाडी प्रमुख जगन्नाथ इंगळे , सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे तसेच कामगार संघटना , पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी , कर्मचारी
तसेच परिसरातील सभासद , शेतकरी , हितचिंतक , ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार , मजुर व सिझन कामाचे कंत्राटदार आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कार्यालय अधीक्षक दगडु फटे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.संतोष मिसाळ यांनी केले.
आ.समाधान आवताडे यांचा विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा
मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांचा ४५ वा वाढदिवस पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली आर्थिक दृष्ट्या अनेकांना भयानक परिस्थितीला तोंड द्यावे लागत त्या पार्श्वभूमीवर वाढदिवसासाठी अनावश्यक खर्च न करता एक जबाबदार आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी व सत्कार नव्हे तर सत्कार्य करण्यासाठी नेहमीच मतदारांचे आशीर्वाद घेत
आपले सामाजिक आणि राजकीय कार्य अविरतपणे सुरु ठेवणारे लोकप्रतिनिधी म्हणून आ.समाधान आवताडे यांचा जिल्ह्यातील राजकारण आणि समाजकारण कार्यक्षेत्रात परिचय आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आ. समाधान आवताडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विविध सहकारी , खाजगी व राजकीय सामाजिक संस्थानी अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा दिल्या.
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम येथे टान्न भोजन , नरवीर तानाजी चौक येथे नेत्रतपासणी शिबीर तसेच आवताडे स्पिनर्स प्रा.लि. मंगळवेढा येथे आरोग्य शिबीर , रक्तदान शिबीर ,
गुणवंत कामगार सत्कार , दामाजी मंदिर येथे भाविक भक्तांना मिष्टान्न भोजन , निराधार मुलांना खाऊवाटप करण्यात आले.
त्याचबरोबर श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस मजूर व इतर कामगार यांना ब्लँकेट , केळी वाटप व पर्यावरणपूरक वृक्षारोपण करण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज