टीम मंगळवेढा टाईम्स।
वाळूच्या गाडीची टीप पोलिसांना का देतो? असे म्हणून एका २० वर्षीय तरुणास जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी
आकाश संजय रोकडे, महेश संजू ठेंगील व अनोळखी एकजण या तिघाविरुध्द अनुसूचित जाती जमाती कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
यातील फिर्यादी अभिषेक बाळासाहेब लोंढे (वय २०, रा. मुढवी) हा दि. ६ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता घरी असताना वरील आरोपी तथा फिर्यादीचे मित्र हे घरी आले व त्यांनी चल तुझ्याकडे आमचे काम आहे,
असे म्हणाल्याने फिर्यादीस त्यांच्या सोबत चारचाकी वाहनात बसवून मंगळवेढा ते दामाजी साखर कारखाना रोडने सूत मिलजवळील पाण्याच्या कॅनॉलजवळ आल्यावर आरोपीने फिर्यादीस तू आमच्या वाळूच्या गाडीची टीप पोलिसांना का देतो,
असे म्हणून खालच्या पातळीवर गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली व तुम्ही लोक कधीच सुधारणार नाही, असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
त्याचबरोबर फिर्यादीने मी टीप देत नाही, माझा काय संबंध नाही, असे म्हणताच आरोपी आकाश रोकडे व महेश ठेंगील व अन्य एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज