मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांना तपासून औषधे देत त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोन डॉक्टरांवर सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत ऐवळे यांनी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून वीरेंद्र भालचंद्र जाधव, कलीम इब्राहिम शेख असं गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील एका गावात आरोग्य शिबीर आयोजित करून बोगस डॉक्टरांनी दुकान मांडले होते.
गावातील ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकार्यांना बोलावून बोगस डॉक्टराचं पितळ उघड केलं आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऐवळे यांनी अधिक विचारपूस करत वैद्यकीय प्रमाणपत्रे मागितले. त्यावेळी बोगस डॉक्टराने वादविवाद घालण्यास सुरुवात केली.
ग्रामस्थांसमोर बोगस डॉक्टर म्हणत होता, ‘मी कुठे म्हणालो, मी डॉक्टर आहे. मी तर फक्त जडिबुटी देत आहे’, असा खुलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोग्य अधिकारी डॉ. ऐवळे यांनी सर्व चौकशी करून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एका मंदिरात बोगस आरोग्य शिबीर आयोजित केले होते
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील एका मंदिरात बोगस डॉक्टर उपचारासाठी येत असल्याची तक्रार एका संघटनेने आरोग्य विभागाकडे दिली होती. या तक्रारीवरून बोगस डॉक्टर जिल्हा शोध पथकातील डॉ. ज्ञानेश्वर लांडगे, डॉ. चंद्रकांत ऐवळे व इतर सदस्य यांनी रविवार १० ऑगस्ट रोजी संबंधित ठिकाणी छापा मारला.
तेव्हा आरोपी वीरेंद्र आणि कलीम हे दोघे रुग्णांना तपासत होते. आरोग्य शिबिरात रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारची पावडर स्वरूपात औषधे देत होते. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी रंगेहाथ कारवाई केली आहे.
बोगस डॉक्टराने बोगस आरोग्य पथक घेत उपचार सुरू केले
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाई करताना सर्व घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं. बोगस डॉक्टर वीरेंद्र भालचंद्र जाधव, कलीम इब्राहिम शेख यांनी आरोग्य पथक नेमून उत्तर सोलापूर तालुक्यातील मंदिरात आरोग्य शिबीर आयोजित केलं होतं.
पाच ते सहा महिला स्वतःला नर्स सांगून उपचार करत होते. जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य पथकाने आरोपींकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नोंदणीची माहिती विचारली. पण, त्यांना कागदपत्रे सादर करता आले नाही. यासाठी आरोपींनी दोन दिवसांची लेखी मागणी केली.
त्यानंतरही कोणतेही कागदपत्रे जमा न केल्याने याबाबत गुन्हा दाखल झाला. आरोपींकडून एक पावडरची डबी जप्त करण्यात आली आहे. याचा तपास पोलिस नाईक मुल्ला हे करत आहेत.
मी स्वतःला डॉक्टर मानत नाहीत; फक्त जडिबुटी देतोय
संशयीत आरोपी वीरेंद्र भालचंद्र जाधव, हा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. ‘मी स्वतःला डॉक्टर कुठं म्हणत आहे, मी फक्त जडिबुटीची औषधे देत आहे’. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय उपचार करण्याचे प्रमाणपत्रे मागितले परंतु बोगस आरोग्य शिबीर आयोजित करणाऱ्यास प्रमाणपत्रे सादर करता आले नाही.
संशयीत आरोपी आरोग्य शिबिर गावात भरवणार असल्याचं सांगून याची जाहिरात करत होते. रुग्णांना उपचारानंतर त्यांना खाण्यासाठी एक पावडर द्यायचे. त्यासाठी जवळपास पाचशे ते सातशे रुपये त्यांच्याकडून घेत होते. अशाच प्रकारे दिलेल्या औषधामुळे त्रास झाल्याने एका महिलेनेही याची तक्रार दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज