मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
तु आमच्या-गावामध्ये खूप चोरी केली आहे. तसेच – बोगस कामेही केली आहेत असे म्हणून एका ग्रामपंचायत अधिकाऱ्यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणून पत्नीला छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश पवार, अक्षय इंगोले (रा.खोमनाळ) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती – अशी, यातील फिर्यादी अभिजीत अशोक लाड हे ग्रामपंचायत अधिकारी असून ते दि.१३/१०/२०२३ ते २९/५/२०२४ या कालावधीत खोमनाळ ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नेमणूकीस होते.
सदर नेमणूक कालावधीत ग्रामपंचायत अधिकारी यांनी केलेल्या विकास कामाबद्दल आरोपी प्रकाश पवार यांनी गटविकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी अर्ज केला होता. सदर अर्जाच्या चौकशीच्या अनुषंगाने फिर्यादी अभिजीत लाड यास विस्ताराधिकारी हरीदास नरळे यांनी चौकशीसाठी खोमनाळ ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले होते.
दि. १८ डिसेंबर रोजी विस्ताराधिकारी चौकशी करीत असताना ११.३० वा. विस्ताराधिकारी हरीदास नरळे, विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती इंगोले, ग्रामपंचायत कर्मचारी अजीत लंगडे, ग्रामपंचायत ऑपरेटर श्रीमती अयोध्या शिंदे,
सरपंच बायडाबाई मदने, ग्रामस्थ बाबासाो बिले, राजेंद्र मदने, निखील सरवदे, अशोक चौंडे, राहुल कसबे यांचेसह आरोपी प्रकाश पवार आदी सर्वजण हजर असताना दुपारी १२.०० वा. आरोपीने तु आमच्या गावामध्ये खूप चोरी केली आहेस, बोगस कामे केली आहेत असे म्हणून शिवीगाळी करून फियार्दीची कॉलर पकडून हाताने मारहाण करून शासकिय कामात अडथळा केला.
यावेळी आरडाओरड ऐकून आरोपी अक्षय इंगोले यानेही ग्रामपंचायत कार्यालयात येवून शिवीगाळ केली. तसेच उपस्थित लोकांनी सोडवासोडव केल्यानंतर ते दोघे तेथून निघून जात असताना फिर्यादीस तु आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्यास
मी सुध्दा तुझ्यावर माझे पत्नीस छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देवून ते दोघे तेथून निघून गेल्याचे लाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 7588214814
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 7588214814 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज