टीम मंगळवेढा टाईम्स।
घरगुती वीज बिल भरण्याचे कारण सांगून महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोलावून शिवीगाळ व जबरी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी रवी नायकवडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची फिर्याद मंगळवेढा शाखा कार्यालयातील कंत्राटी वायरमन संग्राम गोरख फटे (वय 38 रा. फटेवाडी) यांनी दिली असून त्याच्या भागातील
विद्युत ग्राहक महादेव नायकवडी यांचे घरासमोर जाऊन घरातील विज बिल वेळेत भरण्याबाबत आठ दहा दिवसांपूर्वी सांगितले होते.
दि.4 डिसेंबर रोजी फिर्यादी व त्याचे सहकारी विजय पाटील व अण्णासो भगरे भागात काम करीत असताना त्याचे मोबाईलवर रवी नायकवडी यांनी फोन करून माझ्या घरचे वीज बिल भरायचे आहे ते घेऊन जावा असे सांगितले
फिर्यादीने आज सुट्टी आहे उद्या भरा असे सांगितले तरी देखील फिर्यादीला खोमनाळ नाक्याजवळील उड्डाणपुलाखाली बोलावून फिर्यादीस
रवी नायकवडी यांनी शिवीगाळ व दमदाटी करून त्याच्या प्लास्टिकच्या कॅनने डोक्यात मारून जखमी केले
जखमी वायरमनला मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज