मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस की नाही? आपण पळून जावून लग्न करु असे म्हणत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरुन

जवळ ओढून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्या प्रकरणी सचिन गणेश होवाळे (रा. शिरनांदगी) याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी ही अल्पवयीन १६ वर्षाची असून दि.०२ मे २०२५ च्या सकाळी ११ ते दि.२४ ऑक्टोबर च्या रात्री ९.३० वाजेपर्यंत आरोपी सचिन होवाळे याने वारंवार पिडीतेच्या घरी येवून

तिच्या आई वडिलांना तुम्ही मुलगी का देत नाही? असे म्हणून पिडीतेस तू माझ्या सोबत लग्न करणार आहे का नाही? असे म्हणून आपण पळून जावून लग्न करु असे म्हणाल्यावर

पिडीता आरोपीस म्हणाली, मी लहान आहे माझे अजून १८ वर्षे पुर्ण झाले नसून माझे वडिल जिथे लग्न लावून देतील तिथे मी लग्न करणार आहे असे सांगत असताना

आरोपीने पिडीतेचा जबरदस्तीने डावा हात धरुन जवळ ओढून मिठीत घेवून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातुरकर हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











