टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा शहरातील एका वकिलाचा दोन एकर शेतातील उभा ऊस अज्ञात व्यक्तीने पेटवून देवून जवळपास दोन लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी अॅड.विश्वास रघुनाथ देशमुख (वय 54) यांची मंगळवेढा शिवारात गट नं.1945 मधील दोन एकर ऊसाचे पिक असून दि.13 च्या सायंकाळी 5.00 ते दि.14 च्या सकाळी 7.00 च्या
दरम्यान अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून ऊसाचा फड जाळून नुकसान केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान शेजारी राहणारे शेतकरी गौस इनामदार यंानी मोबाईलवर फोन करून फिर्यादीचे भाऊ भालचंद्र यास फोन करून सांगितले की,ऊसाच्या पिकास आग लागली आहे.
तुम्ही लवकर या असे म्हटल्यावर फिर्यादीने शेतावर जावून पाहिले असता मागील वर्षी लावलेले सुरु ऊसाचे पिक अर्धवट जळालेले होते. याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार शेख हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज