मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आयुष्यमान प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील लाभार्थीची कार्ड नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाभर विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गटनिहाय नोडल अधिकारी नेमले असून ३० मेपर्यंत १०० टक्के नोंदणी करण्याचे निर्देश श्री. स्वामी यांनी दिले आहेत.
राज्य शासनातर्फे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे आयुष्यमान कार्ड नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थीची नोंदणी खूपच कमी असून १०० टक्के नोंदणीचे आदेश देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर व आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही नोंदणी होणार आहे. त्यासाठी गृहभेटी करून लाभार्थीची नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी विशेष कॅम्प राबविले जाणार असून गणनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक झेडपी सीईओंनी केली आहे.
दरम्यान, ग्रामसभेत तो विषय घेऊन योजनेबद्दल व त्या विशेष मोहिमेबद्दल नागरिकांना माहिती द्यावी, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.
११ तालुक्यातील ४१ गटांसाठी २७ नोडल अधिकारी नेमले असून त्यांच्या माध्यमातून ३० मेपर्यंत नोंदणी पूर्ण केली जाणार आहे. दररोजचा अहवाल नोडल अधिकाऱ्यांना द्यावा लागेल, असेही श्री. स्वामी यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.
आयुष्यमान कार्डासाठी नोंदणी केल्यानंतर आठ ते दहा दिवसात कार्ड तयार होते. ते कार्ड आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी डाऊनलोड करून साध्या कागदावर प्रिंट काढून वाटप करावे.
आपले सरकार सेवा केंद्र चालक हे कार्ड नोंदणी करण्यास टाळाटाळ करीत असल्यास त्यांना नोटीस बजावून त्यांची सेवा समाप्तीचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठवावेत, असेही स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज