मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पंढरपूरहून मंगळवेढ्याकडे येणाऱ्या इनोव्हा कारच्या आडवे कुत्रे आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात झाडावर आदळून कारचे मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणे वाहन चालवून नुकसान केल्याप्रकणी चालक गुरुदिपसिंह सभरवाल (रा. वर्सोवा अंधेरी, मुंबई) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी, यातील फिर्यादी सोपान सुखदेव खुळे हे मुंबई येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात दि.२० डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता फिर्यादी हे पाठखळ येथे घरी असताना इनोव्हा
कार क्र.एम.एच.१३ बी.एन.६०३० वरील चालक तथा आरोपी गुरुदिपसिंह सभरवाल यांनी फोन करुन कळविले की, पंढरपूरहून मंगळवेढ्याकडे येत असताना
मंगळवेढा शहरा हद्दीतील हॉटेल संजय जवळ अचानक कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडास जोराची धडक बसल्याने कारचे समोरील बंपर,
बोनेट, रेडीएटर टाकी, चेस व इंजिनला धडक होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची फिर्याद खुळे यांनी दिल्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्या प्रकरणी चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 7588214814
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 7588214814 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज