mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लग्नसराईत सोने खरेदी करणे झाले सोपे, सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 16, 2020
in राज्य
सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

भारतात सोने-चांदीचे भाव घसरण्याचे सत्र सुरुच आहे. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे भाव 460 रुपयांनी घसरले. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48 हजार 371 रुपयांवर पोहोचली आहे.

एचडीएफसी सिक्योरिटीजने याबाबत माहिती दिली. याआधी सोन्याचा दर प्रती 10 ग्रॅम 48 हजार 831 रुपयांपर्यंत घसरला होता. सोनेपाठोपाठ चांदीचाही दर घसरला आहे. हा दर 629 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे सराफ बाजारात चांदीचा दर 62 हजार 469 प्रती किलोवर येवून पोहोचला आहे. याआधी हा दर 63 हजार 98 रुपये प्रती किलो इतका होता.

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 460 रुपयांनी घसरली आहे. यावरुन सोन्याच्या जागतिक किंमतीत झालेली घसरण आणि रुपयाच्या किंमतीत झालेली सुधारणा लक्षात येते अशी प्रतिक्रिया एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ जिंस विश्लेषक तपन पटेल यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रतीऔंस 1830 डॉलरपर्यंत घसरली. तर चांदीची किंमत प्रतीऔंस 23.82 डॉलरपर्यंत घसरली. शेअर मार्केटमध्ये सुरु असलेल्या व्यवहारांमुळे रुपयाची किंमत 9 पैशांनी वाढली.

त्यामुळे रुपयाची किंमत प्रती डॉलर 73.55 रुपयांवर पोहोचली आहे. विदेश बाजारात डॉलरचा भाव कमी झाल्याने रुपयाची किमत वाढली आहे.

भारतात सोन्याच्या किंमतीत ऑगस्ट महिन्यापासून प्रचंड घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम चक्क 56 हजार 379 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, आता हीच किंमत थेट 48 हजार 371 रुपयांपर्यंत घसरली आहे.

कोरोना लस आल्याच्या बातमीनंतर गुंतवणुकदारांना सोन्यापेक्षा शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी जास्त सुरक्षित असल्याचं वाटत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचा दर घसरला आहे. त्याचा परिणाम देशातील सराफ बाजारातही बघायला मिळत आहे.

कोणत्याही गुंतवणुकीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केव्हा खरेदी करायची आणि केव्हा विकायची हे ठरवणे. एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. गेल्या सत्रात डॉलरच्या दरात वाढ झाली. नव्या कोरोना प्रकरणांमुळे सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणीही वाढली.

मात्र, कोरोना लसीच्या प्रगतीमुळे आणखी नफा वाढू शकतो, त्यामुळे सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवरील सोने डिसेंबर फ्युचर्समध्ये सुमारे 48 हजार 600 रुपयांनी विकले गेले.

त्यामुळे 49 हजार रुपये स्टॉपला ठेवा आणि प्रती दहा ग्रॅम 48 हजार रुपयांचे लक्ष्य ठेवा. गुंतवणूक करण्यापूर्वी दैनंदिन बदलांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे असं अनुज गुप्ता यांनी सोने विक्रेत्यांना आवाहन केलं.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोन चांदी दरात घसरण

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post
महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

बोगस लाभार्थींनी पैसे परत न केल्यास सात-बारा उताऱ्यावर बोजा चढणार

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा