टीम मंगळवेढा टाईम्स ।
तांत्रिक सांधनांचा वापर करुन घरफोडी करुन चोरी करणाऱ्या चोरटयांना अटक करुन मंगळवेढा पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणून एकूण ९५,०००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.
मंगळवेढा पोलीस ठाणे हददीत घरफोड्याचे प्रमाण वाढल्याने घडलेले गुन्हे उघडकीस आणणेसाठी व गुन्हे घडण्यास प्रतिबंध करणेकामी मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथक स्थापन करुन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथकातील पोसई पुरुषोत्तम धापटे, पोकॉ महेश पोरे, पोकॉ सुरज देशमुख, पोकों वैभव घायाळ सोबत पोहेकॉ मनोज खंडागळे, पोना ईश्वर दुधाळ यांनी
तांत्रीक विश्लेषणाव्दारे व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विनोद ऊर्फ विनायक सुरेश पवार (वय २८ रा नंदुर ता मंगळवेढा) यास ताब्यात घेवून त्याचेकडे केलेल्या
तपासामध्ये त्याने मौजे नंदुर ता मंगळवेढा गावातील फिर्यादी महादेव नामदेव भोजने यांचे राहते घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा मुददेमाल चोरुन नेल्याचे कबुली दिल्याने
सदर आरोपीकडून ९०,०००/- रु किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, ५०००/- रु किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.
सदरची पोलीस अधिक्षक सरदेशपांडे, अप्पर अधिक्षक प्रितम कामगिरी शिरीष पोलीस यावलकर, मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचे
मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोसई पुरुषोत्तम धापटे, पोकॉ महेश पोरे, पोकॉ सुरज देशमुख, पोकॉ वैभव घायाळ सोबत पोहेकॉ मनोज खंडागळे, पोनाईश्वर दुधाळ यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज