मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । समाधान फुगारे
मंगळवेढ्यात अद्ययावत अशा नाट्यगृहाची उभारणी लवकरात लवकर व्हावी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद मुंबईच्या नियामक मंडळ सदस्या सौ.तेजस्विनी सुजित कदम यांनी मंगळवेढा नाट्यपरिषद शाखेच्या वतीने दिले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित गो. ब. देवल स्मृतीदिन व पुरस्कार वितरण आणि यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलन नूतनीकरण समारंभा प्रसंगी मुख्यमंत्री उपस्थित होते.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद विश्वस्त उद्योगमंत्री उदय सामंत, अध्यक्ष प्रशांत दामले, विश्वस्त मोहन जोशी, उपाध्यक्ष नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर, अजित भुरे, सतीश लोटके आदीजन उपस्थित होते.
नाट्य, साहित्य क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या मंगळवेढा शहरात एक अद्ययावत असे नाट्यगृह लवकरात लवकर व्हावे व रसिकांची गैरसोय दूर व्हावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, तेजस्विनी कदम यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होणार आहेत. तसेच नाट्यगृह होण्यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यात अद्यावत असे नाट्यगृह नसल्यामुळे अनेक कलाकार व रसिकांची गैरसोय होत आहे.
मंगळवेढयात नाट्यगृह झाल्यानंतर अनेक नवीन कलाकार या माध्यमातून तयार होणार आहेत. तसेच मंगळवेढेकरांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल असे तेजस्विनी कदम म्हणाल्या.
यावेळी यतिराज वाकळे, अशपाक काझी, युवराज जगताप, सुहास माने, सचिन ढगे, बंटी मुरडे आदीजन उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज