टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने आणखीन एक नवीन नियम यंदापासून लागू केला आहे.
नव्या नियमानुसार बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना विद्यार्थी सापडल्यास सलग होणाऱ्या पाच वेळच्या परीक्षेसाठी बंदी घालण्यात येणार आहे.
या नव्या नियमामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याने कॉपी केल्यास पुढील तीन वर्षे परीक्षेपासून वंचित राहणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील 2 हजार 950 विद्यार्थ्यांची 7 केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीत २५ विद्यार्थी असणार आहेत, अशी माहिती केंद्रप्रमुख बजीरंग पांढरे यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातून 2 हजार 950 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यामध्ये विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना भयमुक्त परीक्षा देता यावी म्हणून पूर्ण तयारी करण्यात येत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील 7 केंद्रांवर वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 7 केन्द्र संचालक, शिपाई असणार आहेत.
या असणार सुविधा
■ प्रत्येक केंद्रावर शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
■ वीज खंडित झाली तर पर्याय म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात येत आहे.
■ बोर्डाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्याला शेवटी १० मिनिटे वेळ वाढवून दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प | देऊन स्वागत
बारावीच्या परीक्षा आज मंगळवार, दि. २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. २१ मार्चपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी रांगोळी काढून गुलाबपुष्प देऊन होणार स्वागत केले जाणार आहे.
■ इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे परीक्षेच्या पहिल्या दिवशी आकर्षक रांगोळी काढून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे.
कॉपीमुक्त परीक्षा व्हावी म्हणून प्रत्येक केंद्रावर २ पोलिस व २ होमगार्ड असणार आहेत. परीक्षा केंद्रावर जाताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठीही कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यात महिला तलाठी व महिला शिक्षका असणार आहेत. प्रत्येक केंद्रावर एका केंद्र प्रमुखाची नियुक्ती केली जाणार आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज