टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाने सगळीकडेच हाहाकार माजवला आहे. दरम्यान सरकारने कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहे.
मग यामध्ये लसीकरण नाही केलं तर पगार नाही, पेट्रोल नाही, किराणा नाही. अशाच प्रकारे सोलापूर जिल्हा प्रशासनाने बुधवारी
शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करताना कोरोनाचे दोन्ही डोस बंधनकारक करा, असे आदेश सर्व रेशन दुकानदारांना दिले आहे.
दरम्यान याची अंमलबजावणी कालपासून झाली आहे.याबाबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन दुकानदारांची बैठक घेतली.
बैठकीत जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात आठ लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामुळे निम्मी लोकसंख्या रेशन दुकानांशी संबंधित आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांना खालील सूचना दिल्या आहेत. यामध्ये कार्डवरील सर्व सदस्य कोरोना लस घेतलीय का, याची चाचपणी करण्याचे आदेश दुकानदारांना दिले आहेत.
पहिला डोस घेतला असेल आणि दुसरा डोस घेतलेला नसेल तरी संबंधितांना धान्य देऊ नका, अशा सूचना आहेत, असे रेशन दुकानदारांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का अत्यल्प असल्याने लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेतला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना कोरोनाचे दोन्ही डोस बंधनकारक केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज