टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेला हद्दपारीचा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर एन लड्डा यांनी रद्द केला. मुंबई उच्च न्यायालयाने रोहित ऊर्फ अण्णासाहेब विठोबा आसबे आणि तानाजी विठोबा आसबे यांच्यावरील सोलापूर पोलीस अधिक्षकांचे हद्दपारीचा आदेश न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या एकल खंडपीठाने निर्णय दिला.
यात हकीकत अशी की, हद्दपार प्राधिकरण तथा तत्कालीन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दोन्ही याचिकाकर्ते हे सराईत गुन्हेगार आहेत, तसेच कलम ३७९ गुन्हात शिक्षा लागलेली आहे, त्यांच्यामुळे समाजात भीतीची वातावरण निर्माण झाली आहेत म्हणून १४ ऑगस्ट २०२४ रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
त्यावर अण्णासाहेब आसबे यांनी पुणे येथे विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते, परंतु पुणे येथील विभागीय आयुक्त यांनी सदरचे अपीलामध्ये तथ्य नाही म्हणून अपील फेटाळले होते. त्यामुळे आसबे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. मंजुनाथ कक्कळमेली यांचे मार्फत दाद मागितली होती.
त्यावर सुनावणी दरम्यान युक्तिवाद करताना, ऍड कक्कळमेली यांनी याचिकाकर्ते यांच्या विरोधात ७ गुन्हे प्रलंबित असेल तरी ते फक्त एका पोलीस स्टेशन मधले आहेत व कलम ३७९ खाली शिक्षा झाली असेल त्यास स्टे आहे. त्यामुळे सोलापूर पोलीस अधीक्षक पोलीस अधिनियम नुसार सोलापूर शहर हद्दपार करू शकत नाहीत.
सदरचे गुन्हे हे जीवितास हानी पोचवणारे नाहीत. एकूण ७ गुन्हे प्रलंबित असेल तरी त्यांना तडीपार करणेस कुठलेही कारण त्या गुन्हेमुळे बनलेले नाही, शो कॉज नोटीस ही पूर्णतः बेकायदेशीर व अन्यायकारक आहे असा युक्तीवाद केला.
त्यावर न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांनी विभागीय आयुक्तांचे आदेश तथा सोलापूर पोलीस अधिक्षांचे आदेश रद्द बातल ठरविले.
यावेळी सुनावणी दरम्यान याचिककर्त्यांच्या नोटीसवर टिप्पणी करताना न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांनी “पोलिसांना हद्दपारी वरती ट्रेनिंग देण्याची गरज” असे तोंडी निरीक्षण नोंदविले असल्याचे अॅड. कक्कलमेली यांनी सांगितले.
यात सरकारकडून अॅड.योगेश दाबके यांनी तर याचिककर्ते कडून अॅड.मंजुनाथ कक्कळमेली यांनी काम पाहिले. यावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विजय पिसे हजर होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज