टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा भैरवनाथ शुगरचे संस्थापक मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्य लवंगी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,यूनिट नं ०३ मध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उदघटन भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,चे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी 101 जणांनी रक्तदान केले. रक्तदान करणार्यांना आयोजकांच्या वतीने पाण्याचा ज्यार वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,यूनिट नं ०३ चे व्हा.चेअरमन मा.अनिल सावंत यांनी केले.
यावेळी त्यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी केलेल्या शिवजलक्रांती व आरोग्याच्या सुविधा तसेच इतर वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कामांची माहिती दिली.
यावेळी जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, रामचंद्र जाधव, श्रीपती माने, चंद्रकांत देवकर, इंद्रजीत पवार, तानाजी चव्हाण, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, प्रॉडक्शन मॅनेजर बाळासाहेब शिंदे, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण,
शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे, एच आर मॅनेजर संजय राठोड, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, ईडीपी मॅनेजर नवनाथ चव्हाण, स्टोअर कीपर दत्तात्रय गाडे, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे,फायनान्स अकौंटंट देवानंद पासले,
अभिजीत पवार, प्रमोद भोसले,सुहास जाधव तसेच भैरवनाथ शुगरचे अधिकारी व कर्मचारी, शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार तसेच लवंगी, सलगर, आसबेवाडी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज