मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आज चित्रपट क्षेत्रातही मंगळवेढयाने पाऊल टाकले असून या परिसरातून दर्जेदार असे चित्रपट निर्माण व्हावेत असे प्रतिपादन मंगळवेढयाचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांनी केले.
शहर एन्टरटेन्मेंटची तिसरी निर्मिती असलेल्या निःशब्द या लघुपटाचा मुहूर्त सोमवारी सकाळी 11 वाजता चंद्रशेखर कोंडुभैरी यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
कोंडुभैरी म्हणाले,संतांच्या मंगळवेढयातील कलाकार आज सर्वत्र चमकत आहेत. कलेचाही वारसा मंगळवेढयाला जुना आहे. आता नवनवीन चित्रपट निर्माण होत आहेत. त्यामुळे स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हायचे असेल तर चित्रपट तितकेच दर्जेदार व्हावेत यासाठी निर्माते, दिग्दर्शकांनी प्रयत्न करावेत असे सांगितले.
यावेळी निर्माता दिगंबर भगरे, दिग्दर्शक संतोष शिंदे, माजी नगरसेवक अरूण किल्लेदार, कलावंत अजिंक्य कुलकर्णी, नामदेव, भारत दत्तु, संतोष ढावरे, राहुल पांढरे, आकाश रोंगे, अमोल वस्त्रे यांचेसह राजशेखर कोंडुभैरी, चन्नबसवेश्वर मेहरकर आदि उपस्थित होते.
———–

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज