मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आमदार प्रणिती शिंदे अज्ञानी आहेत. त्यांना राजकारणातले फार कळत नसल्याचे दिसतय, अशी टीका वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली.
सोलापुरातील एका अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या पिडीत मुलीची भेट घेण्यासाठी ठाकूर सोमवारी सोलापुरात होत्या. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकूर यांना प्रणिती शिंदे यांनी अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ठाकूर म्हणाल्या, मला प्रणिती शिंदे यांच्याविषयी फारसे बोलायचे नाही. त्यांना राजकारणातले फार काही कळतय असे वाटत नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी सीएए, एनआरसी विरोधात आंदोलने केली आहेत का? हे लोक इतरांनी केलेल्या आंदोलनात घुसत आहेत. वंचित बहुजन आघाडीने राज्यात सीएए, एनआरसी विरोधात बंद पुकारला होता. या बंदला प्रतिसाद मिळाला होता. काँग्रेसचे लोक हे विसरले आहेत.
आम्ही बहुजनांचे पाठिराखे आहोत, असा कांगावा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. नागरीकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी)बाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका संदिग्ध आहे. या दोन्ही पक्षांनी विधीमंडळात आपली भूमिका स्पष्ट करुन या दोन्ही कायद्यांना विरोध करावा. पश्चिम बंगाल आणि केरळ सरकारने या कायद्याला विरोध करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने भूमिका घेणे अपेक्षित आहे. विधीमंडळाच्या अधिवेशानात याबाबत निर्णय व्हायला हवा. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी याबाबत आग्रही आहेत, असेही ठाकूर म्हणाल्या.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज