टीम मंगळवेढा टाईम्स ।
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरून मद्यपीने ब्लेडने दोन सख्ख्या भावांवर वार करीत जखमी केले. ही घटना सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संगेवाडी, ता. सांगोला येथे घडली.
याबाबत जखमी राजेंद्र किसन नष्टे यांनी फिर्याद दिली असून , उद्धव दत्तात्रय खंडागळे (रा .संगेवाडी ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र नष्टे हे दुकानाची झाडलोट करीत असताना उद्धव खंडागळे याने त्यांच्या दुकानासमोर येऊन मला दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणाला. त्यास पैसे न दिल्याने अर्वाच्य शिवीगाळ केली.
त्यावेळी त्याच्या भावकीतील पोपट खंडागळे यांनी त्यास येथून हाकलून लावले. त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी त्यांच्या घराजवळ राहणारे सुरेश ऊर्फ लाला खंडागळे यांनी उद्धव हातात दगड घेऊन तुझ्या चारचाकी गाडीवर मारत असल्याचे सांगितले.
घराकडे गेले असता तो त्यांच्याकडे पाहून शिवीगाळ करीत निघून गेला. त्यावेळी त्यांचा भाऊ स्वप्नील नष्टे यांनी त्यास पाठलाग करून पंढरपूर रोडवरील प्रभू अण्णा मंदिराजवळ पकडले.
तेव्हा त्याने त्याच्या खिशातील ब्लेडने डाव्या कानाजवळ, गळ्याच्या डाव्या बाजूस, तसेच डाव्या दंडावर मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज