मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. निकालाचा पहिला कल हाती आला आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.
काँग्रेससाठी बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी तयारी सुरू आहे. काँग्रेस सरकार स्थापन झालं आणि तेही पूर्ण बहुमत झाल्यावर सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व आमदारांना दाखले घेऊन बंगळुरूला येण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विशेष म्हणजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सातत्याने अहवाल घेत आहेत. निकालानंतर आमदारांना घेऊन बेंगळुरूला येण्यास सांगण्यात आले.
हेलिकॉप्टर आणि उड्डाणाची तयारी सुरू आहे. बेळगाव धारवाड हुबळी गुलबर्गा बिलारी येथे हेलिकॉप्टर आणि उड्डाणाची व्यवस्था केली आहे.
निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत भाजपला कोणत्याही प्रकारे संधी मिळू नये, यासाठी काँग्रेसकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक मिनिटाचा अहवाल घेतला जात आहे.
प्रत्येक जागेचा मागोवा घेतला जात आहे. सर्व आमदारांना कनेक्टिंग पॉईंट्सवर पोहोचल्यानंतर बंगळुरूला येण्यास सांगितले आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे.
कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदारसंघांसाठी 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतदान पूर्ण झालं.
या वेळी राज्यात विक्रमी 73.19 टक्के मतदान झालं.224 जागांसाठी निकाल हा आज जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजता राज्यभरात 36 केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल.
मतमोजणीसाठी सर्व केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 224 जागांसाठी निकाल हा आज जाहीर होणार आहे.
एक्झिट पोलमध्ये जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने असला, तरी लिंगायत, वोक्कालिगा, मुस्लिमांचे मते कोणाच्या पारड्यात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे
तर बेळगावातील 18 मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होऊ शकतात.
कर्नाटक राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल झाल्याचं पाहायला मिळालंय.
यंदा मात्र हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे आता जनता कुणाच्या पाठिशी राहते आणि कुणाला बाजूला सारते हे आज स्पष्ट होईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज