टीम मंगळवेढा टाइम्स।
मंगळवेढा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी बुधवारी नगरपालिकेत पार पडल्या. निवडी नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. यावेळी पीठासन अधिकारी तथा माळशिरसचे मुख्याधिकारी सुमित जाधव उपस्थित होते.
नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्यासह ९ नगरसेवक तर भाजपा व महायुतीचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली विषय समिती सभापती यांच्या निवडी करण्यात आल्या.

स्थायी समिती सभापती सुनंदा आवताडे (नगराध्यक्षा), सदस्य येताळा भगत (उपनगराध्यक्ष), गौरीशंकर बुरकुल, तरन्नुम दारुवाले, प्रवीण खवतोडे, विजया गुंगे, सोमनाथ आवताडे,

नियोजन व विकास समिती सभापती येताळा भगत, सदस्य प्रतीक्षा मेटकरी, सोमनाथ हुशारे, अश्विनी धोत्रे, सोमनाथ महादेव माळी,

सार्वजनिक बांधकाम समिती सभापती गौरीशंकर बुरकुल, सदस्य चंद्रकांत घुले, मनीषा मेटकरी, प्रमोद सावंजी, अनिल बोदाडे,
पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती तरन्नुम दारुवाले, सदस्य सावित्राबाई कोंडुभैरी, सोमनाथ हुशारे, नागर गोवे, प्रशांत गायकवाड,

स्वच्छता वैद्यक आणि सार्व. आरोग्य समिती सभापती प्रवीण खवतोडे, सदस्य – सावित्राबाई कोंडुभैरी, चंद्रकांत घुले, सीमा बुरजे, अनिल बोदाडे,
महिला व बालकल्याण समिती – सभापती विजया गुंगे, सदस्य सावित्राबाई कोंडुभैरी, मनीषा मेटकरी, प्रीती सूर्यवंशी, विद्यागौरी अवघडे,

शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती – सभापती सोमनाथ आवताडे, सदस्य चंद्रकांत घुले, प्रतीक्षा मेटकरी, सोमनाथ माळी, प्रशांत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या लेखी सूचनेनुसार या निवडी पार पडल्या, सुरुवातीला दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून शासकीय नियमाप्रमाणे निवडी झाल्या, त्यानंतर राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे सत्कार न घेता सर्वांनी उभे राहून श्रद्धांजली वाहिली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














