टीम मंगळवेढा टाईम्स ।
सांभाळ करतो म्हणून जमीन बक्षीसपत्र करवून घेतले. मात्र, जन्मदात्री मातेला घराबाहेर काढताच वृद्ध मातेने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे धाव घेतली. अधिकाऱ्यांनी ते बक्षीसपत्र रद्दबातल ठरवत त्या महिलेला दिलासा दिला.
आई, वडील आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा, २००७चे कलम ४, ५, २३ अन्वये दाखल केलेला अर्ज निकाली निघाला. याप्रकरणी मुलाने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत उपविभागीय अधिकारी यांचा निकाल कायम ठेवला आहे.
बार्शी म्युनिसिपल हद्दीत बागायत जमीन २० आर इतकी जमीन एका वृद्ध महिलेची आहे. तिला दोन मुले आहेत. २० आर इतके क्षेत्र संबंधित महिलेच्या हिश्शाला आले होते. त्या जमिनीची ती स्वतंत्र एकटी मालक झाली. त्याप्रमाणे महसूल दप्तरी सर्वांच्या नोंदी झाल्या. नोंदीप्रमाणे तिची जमीन स्वतः कसत होती.
सांभाळ करण्याचे आश्वासन दिल्यानंतर २८ ऑक्टोबर २०१० रोजी तिची जमीन बक्षीसपत्र करून त्याला दिली. परंतु, मागील दोन-तीन वर्षांपासून मुलगा सांभाळ व देखभाल करीत नव्हता.
त्यानंतर त्या महिलेने ज्येष्ठ नागरिक कायदा कलम २३ प्रमाणे वादग्रस्त मिळकतीबाबत २८ ऑक्टोबर २०१० रोजी मुलाच्या हक्कात करून दिलेले बक्षीसपत्र रद्द करून मागण्याचा अर्ज बार्शी येथील
अॅड. शिवाजी क्षीरसागर, पवन क्षीरसागर व अक्षय बीडबाग यांच्या मदतीने उपविभागीय अधिकारी सोलापूर यांच्याकडे दाखल केला होता. त्या अर्जावर प्रांताधिकारी यांनी निर्णय दिला होता.
वृद्ध महिलेला उच्च न्यायालयातही दिलासा सुनावणीदरम्यान उपविभागीय अधिकारी (सोलापूर, क्र. १) सदाशिव पडदुने यांनी आई, वडील आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा, २००७चे कलम २३ अन्वये बक्षीसपत्र शून्यवत ठरविल्याचा निकाल जाहीर केला होता.
या निकालामुळे त्या वृद्ध महिलेला उपविभागीय अधिकारी यांच्याकडून दिलासा मिळाला होता. आता उच्च न्यायालयाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यामुळे महिलेला दुसऱ्यांदा न्याय मिळाला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज