मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक आदी पक्ष्यांचा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाला होता. यासंदर्भातचा अहवाल भोपाळ येथील हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळाकडून प्राप्त झाला आहे.
याद्वारे सोलापूर शहर, जिल्ह्यात ‘बर्ड फ्ल्यू ‘चा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करुन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासन आता चांगलेच कामाला लागले आहे.
छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर व किल्लाबाग परिसर येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या परिसराच्या १ ते १० किलोमीटर त्रिजेतील क्षेत्रात प्रतिबंधित भाग किंवा सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे.
बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचाली व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सोलापूर शहरातील दोन्ही बाधित परिसरांची दोन टक्के सोडियम हायपोक्लोराइड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट यांचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरु झाले आहे.
प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील कुक्कुट पालन पक्षांचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना आवश्यकतेनुसार महापालिका आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग व परिवहन विभाग यांना आवश्यकते नुसार मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अहवाल प्राप्त करुन खात्री करावी
या आजाराचा प्रसार इतर ठिकाणी होवू नये यासाठी आजारी असलेल्या अथवा मृत्यू झालेल्या पक्षाचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवावेत. त्याचा अहवाल प्राप्त करुन खात्री करावी, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या.
शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावावी
मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्यासाठी किमान तीन फुट खोल खड्डा खोदून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षांना पुरण्याची प्रक्रिया पूर्व परवानगीने करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज