टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतात काँग्रेस पक्ष स्थापन होऊन 137 वर्षे पूर्ण झाले. त्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहरातील काँग्रेस भवनामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.
यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतच राहणार आहेत, मी मुख्यमंत्री असताना सीमावाद सुप्रीम कोर्टात पाठवला,
महाराष्ट्राने स्पष्ट भूमिका घ्यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना आणखीन कार्यकाळ पूर्ण करायचा आहे अशी टीका त्यांनी केली.
अनेक वर्षे काँग्रेस पक्षातून देशाच्या राजकारणात सक्रीय असलेले एक नेते पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (स्रोत:सकाळ)
मंगळवेढ्यात कॉंग्रेस पक्षाचा स्थापना दिन उत्साहात साजरा
मंगळवेढ्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 138 वा स्थापना दिन धनश्री पतसंस्था, पंढरपूर रोड मंगळवेढा येथील पतसंस्थेच्या प्रांगणात कॉंग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला.
सकाळी साडेआठ वाजता तालुकाध्यक्ष अँड. नंदकुमार पवार यांच्या हस्ते तसेच कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली झेंडावंदन करून साजरा करण्यात आला.
प्रथमतः कॉंग्रेस शहराध्यक्ष राजाभाऊ चेळेकर यांनी प्रास्ताविक तसेच सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी प्रा.काळुंगे यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तसेच काँग्रेसच देशाला समता, एकता, बंधुता तळागळातील कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य नागरिकापर्यंत तसेच शेतकऱ्यांच्याकरीता, कामगारांच्याकरीता,
भारतीय सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांच्या कल्याणा करीता कॉंग्रेस नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे असे आपल्या मनोगतात सांगितले. सदरप्रसंगी प्रा.अकबर मुलानी, अँड नंदकुमार पवार,भारत मासाळ,आर.के.जाधव, मारूती वाकडे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर,राहुल टाकणे, पांडुरंग निराळी, किसन सांवजी, पांडुरंग माळी, राजाराम सूर्यवंशी,सुनिता अवघडे, फारुख मुजावर, मनोज माळी, सुदिन पंडीत, पीर मुजावर, बापुसो अवघडे,
प्रभाकर कुमठेकर, मोहन जाधव, दिलीप वाडेकर, विकास जासूद, नंदू मोरे, नितीन जाधव , बाबा बावचे, राजेंद्र भोसले, अजित लांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आभार अमोल म्हमाणे यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज