मंगळवेढा टाईम्स न्युज।
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींच्या शंकांचं निरसन करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक 181 जारी करण्यात आला आहे.
लाडकी बहिणींनी आवश्यकता असल्यास या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत.

या आणि योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष पडताळणी
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.

काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 चा 1500 रुपयांचा हप्ता अद्याप मिळाला नसल्याचं पाहायला मिळालं होतं. या विरोधात विदर्भात भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, वाशिम जिल्ह्यात लाडक्या बहीणी रस्त्यावर उतरून आक्रोश करत असल्याचं पाहायला मिळालं होतं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला होता. तर, डिसेंबर महिन्याचा लाभ 14 जानेवारीच्या दरम्यान महिलांच्या खात्यात पाठवण्यात आला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













