mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भोसे गटासाठी ‘या’ दोन नेत्यांवर कार्यकर्त्यांचा दबाव; कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 31, 2022
in मंगळवेढा, राजकारण
भोसे गटासाठी ‘या’ दोन नेत्यांवर कार्यकर्त्यांचा दबाव; कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये भोसे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला असल्याने या गटातून दक्षिण भागाचे नेते तानाजी काकडे यांनी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवावी अशी मागणी या भागातील असंख्य कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.

तर दुसरीकडे खरेदी – विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी भोसे जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी शिरनांदगी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मनोज खांडेकर यांनी केली आहे.

भोसे या गटात पूर्वी सोळा गावांचा समावेश होता.पण आता नंदेश्वर व निंबोणी ही दोन गावे दुसऱ्या गटात समाविष्ट करण्यात आली आहेत.

गतवेळेस आरक्षण सर्वसाधारण झाल्याने बरेचजण निवडणूक लढविण्याच्या तयारीत असणार आहेत.

यामध्ये तालुक्याच्या दक्षिण भागातील तानाजी काकडे हे एक धाडसी राजकारणी नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

कोणत्याही निवडणुकीत ते हिरीरीने सहभाग घेतात. त्यांच्याकडे असणारा राजकारणाचा दीर्घ अनुभव, दक्षिण भागामध्ये असणारा दांडगा जनसंपर्क, त्यांच्याकडे असणारे विविध गावच्या युवक वर्गाचे जाळे, गोरगरीब लोकांना आर्थिक मदत करणारा हक्काचा माणूस अशी त्यांची ओळख आहे.

त्यांनी त्यांच्या पत्नी निर्मलाताई काकडे या पंचायत समितीच्या सभापती असताना शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम केले आहे.

त्यांचा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असून त्यांनी आपल्या पत्नीच्या सभापती पदाच्या कारकिर्दीत केलेली कामे, नुकत्याच झालेल्या संत दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडी करण्यामध्ये निभावलेली महत्त्वाची भूमिकाही त्यांना फायद्याची ठरणार आहे.

त्यामुळे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवावी अशी मागणी भोसे गटातील कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.

सिद्धेश्वर आवताडे यांनी भोसे जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवावी – मनोज खांडेकर

सिद्धेश्वर आवताडे हे मंगळवेढा तालुक्यातील युवकांचे, उपेक्षितांचे, शोषितांचे शेतकऱ्यांचे आधारवड म्हणून ओळखले जातात.

मंगळवेढा तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी आधार देण्याची गरज आहे त्या ठिकाणी सिद्धेश्वर आवताडे हे प्राधान्याने पोहोचले आहेत आणि त्यांनी गरजवंतांना मोठी मदत केली आहे.

सिद्धेश्वर आवताडे यांच्यासारख्या खमक्या नेतृत्वाची सध्या भोसे जिल्हा परिषद गटाला म्हणजेच मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागाला गरज आहे.

भोसे जिल्हा परिषद गटाचे आजपर्यंत अनेक रथी – महारथींनी नेतृत्व केले आहे . पण गेल्या सुमारे ३० ते ४० वर्षांपासून असलेल्या समस्या आजपर्यंत सुरूच आहेत.

सिद्धेश्वर आवताडे यांनी दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नासाठी याआधी आवाज उठविलेला आहे आणि यापुढेही ते आवाज उठवून न्याय देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे.

तसेच युवकांच्या प्रश्नावर आवाज उठविणारे व युवकांना सहज उपलब्ध होणारे मंगळवेढा तालुक्यातील ते एकमेव नेते आहेत.

यामुळेच भोसे जिल्हा परिषद गटांमध्ये अनेक गावातील युवक तसेच जेष्ठ नागरिकही सिद्धेश्वर आवताडे यांनी भोसे जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी करीत आहे.

त्यामुळे या आग्रही मागणीचा विचार करून सिद्धेश्वर अवताडे यांनी भोसे गटामधून निवडणूक लढवावी असेही ते बोलताना यावेळी म्हणाले .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तानाजी काकडेसिध्देश्वर आवताडे

संबंधित बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
Next Post
Breaking! साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात; आता पुढे काय?

Breaking! साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात; आता पुढे काय?

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा