टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील शिवप्रेमी चौकातील आठवडा बाजारात लोकवर्गणीतून बसविलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा अर्थात
शिवस्मारकाच्या परिसरातील करण्यात येणाऱ्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व माजी सैनिक व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
आगामी काळात दगडाची घडण करून स्मारकाचे ऐतिहासिक रूप साकरण्यात येणार आहे तसेच वृक्षलागवड करून संपूर्ण परिसर ग्रीन झोन करण्यात येणार आहे.
यावेळी प्रास्ताविकातून पुतळा समितीचे अध्यक्ष अजित जगताप म्हणाले पुतळ्या संदर्भातील सर्व गोष्टींची पूर्तता झालेली असून पुतळ्याचे फिनिशिंग तसेच चबुतऱ्याच्या बाजूचे कंपाउंड व सुशोभिकणाच्या कामाला गती देऊन लवकरच सर्व समाजातील नागरिकांना
तसेच सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना बरोबर घेऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा होणार असून मंगळवेढेकरांची स्वप्नपूर्ती होणार आहे असे सांगितले.
पुतळ्याच्या लगत भव्य टाऊन हॉल होणार असून सदर हॉलमध्ये अनेक ऐतिहासिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
भूमिपूजन समारंभास तालुक्यातील सर्व माजी सैनिक,मराठा महासंघातील सर्व जेष्ठ शिलेदार,जेष्ठ नागरिक,सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे सर्व आजी-माजी अध्यक्ष,शिवप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज