टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर व सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकीसह रोख रक्कम हातोहात गायब करणारा, तसेच बलात्कार व चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेल्या सराईत गुन्हेगारास भिलवडी पोलिसांनी अटक केली.
राजेंद्र गणपती केदार (वय ३८ रा. डोणज, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला गुड्डापूर (ता. जत) येथून ताब्यात घेतले होते.
त्याच्याकडून विविध चोरींमधील रोख रक्कम व पाच दुचाकी असा सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
खंडोबाचीवाडी (ता. पलुस) येथील लहू रामचंद्र शिंदे यांच्या घराचे कुलूप काढून याने ५० हजार रुपयांची चोरी करून पसार झाला होता. या गुन्ह्याची नोंद भिलवडी पोलीस ठाण्यात झाली होती.
पोलीस तपासात गुड्डापूर येथे राजेंद्र केदार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अन्य गुन्ह्यांचीही कबुली दिली.
दरम्यान, राजेंद्र गणपती केदार याने मंगळवेढा तालुका व परिसरात अनेक ठिकाणी चोऱ्या केले असल्याचे बोलले जात आहे खरी माहिती तपासात उघड होईल.
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज