टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट 3 या साखर कारखान्याचा आज शुक्रवार दि.21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.15 गळीत हंगामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी दिली आहे.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सौ.राजश्री पाटील व हुन्नूर येथील दत्त आश्रमचे श्री.सदगुरु समर्थ व्हनमोरे (बाबा) यांच्या शुभहस्ते तर चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.
भैरवनाथ शुगरचा हा नववा गळीत हंगाम असून चालू गळीत हंगामाची जय्यत तयारी झाली आहे.
कारखान्यातील मशीनरीचे ऑफ सीझन मधील ओव्हर ऑयलिंगची व मेंटनन्स इत्यादीचे सर्व कामे पूर्ण झाली आहेत.
तसेच ऊस तोडणी व वाहतूक करारही पूर्ण झाले असून त्यांची मागील वर्षाचे कमिशन व देय बिलाचे वाटप झाले आहे. त्याच बरोबर त्यांना आता चालू गाळप हंगामासाठी पहिल्या हप्त्याची उचलही दिलेली आहे.
चालू गाळप हंगामात कारखान्याने ७ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले असून त्यानुसार ऊस नोंदीचे काम ही जवळपास पूर्ण केले आहे.
तरी आज होणाऱ्या गळीत हंगामाच्या शुभारंभा प्रसंगी ऊस उत्पादक, शेतकरी, तोडणी वाहतूकदार, सभासद व परिसरातील नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज