टीम मंगळवेढा टाईम्स।
दिवंगत आमदार भारत भालके हे कायम परिचारकांच्या विरोध होते म्हणून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेने नानांना निवडून दिले होते.
आजही दोन्ही तालुक्यातील जनता त्याच विचाराने भगीरथ भालके यांच्या मागे आहे. असे असतानाही भगीरथ भालके यांनी परिचारक यांच्या सोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय राजकीय आत्महत्या ठरण्याची शक्यता आहे.
भालके यांनी जनमताचा कौल लक्षात घेता परिचारकांसोबत युती न करता राष्ट्रवादी पक्षासोबत राहणे कधीही त्यांच्या हिताचे ठरेल. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नये, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.
भगीरथ भालके यांनी समविचारी आघाडीच्या माध्यमातून परिचारकांसोबत मंगळवेढा तालुक्यात युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या या निर्णयाचे पंढरपूर तालुक्यात राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी भालकेंवर टिका करत भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशमुख यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी भालकेंच्या या निर्णयाविषयी खंत व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्याच्या भावनांचा विचार करावा असा सल्ला ही दिला आहे.
सलग तीन विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेने केवळ परिचारक विरोधक म्हणून निवडून दिले आहे.
पोटनिवडणुकीत देखील भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात भगिरथ भालके यांना 1 लाख 5 हजार मतदारांनी मतदान करून अप्रत्यक्ष परिचारिकांच्या विरोधात मतदान केले होते.
दरम्यान, भगीरथ भालके यांनी परीचारकांना राष्ट्रवादीत आणावे जो पराभवाचा वचपा आहे, तो 2024 ला गुलाल उथळून करूयात परिचारकांची जर भाजपमध्ये घुसमटत होत असेल त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा असे आवाहन देखील शिंदे यांनी केले आहे.
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजकीय ताकद मोठी असताना भगीरथ भालके यांनी कोणाला विश्वासात न घेता परिचारिकांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही पदाधिकारी जाणार नाही.
या पुढच्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूरचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला आहे. भगीरथ भालके यांनी घेतलेला हा निर्णय त्यांनी मागे घ्यावा. अन्यथा त्यांची ती राजकीय आत्महत्या ठरेल असा दावाही शिंदे यांनी केला आहे. (स्रोत:सरकारनामा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज