मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
पळून जाऊन लग्न करण्यास विरोध होईल. त्यांचे पाय तोडले तर त्यांचा अडथळा येणार नाही, असे म्हणून प्रेयसीने प्रियकराच्या मदतीने वडिलांचे पाय तोडण्याचा कट रचला. मुलगी साक्षी पुण्याला दुकानाचे साहित्य आणायला गेली होती.
सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास बसने शेटफळ (ता. माढा) येथे आली. तेथून आणण्यासाठी वडील कार घेऊन गेले होते. रस्त्यात वडाचीवाडीजवळ लघुशंकेचे निमित्त करून गाडी थांबवण्यास सांगितले.
मागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी पायावर मारायला सुरुवात केली. त्यातील एकास महेंद्र यांनी पकडले असता दुसऱ्याने त्यांच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा मारला. ते रक्तबंबाळ झाले. तेव्हा मारेकरी पसार झाले.
शहा यांना वडाचीवाडीचे उपसरपंच बापू काळे व रामचरण डोंगरे यांनी उपचारासाठी हलवले. या प्रकरणी सहा जणांवर मंगळवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला. सहाही संशयितांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
मुलगी साक्षी शहा तिचा प्रियकर चैतन्य कांबळे, अतिक लंकेश्वर, मयुर चंदनशिवे, राम पवार, आनंद उर्फ बंड्या जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.
माढा शहरातील व्यापारी महेंद्र शहा यांना माढा शेटफळ मार्गावरील वडाचीवाडी गावाजवळ मुलगी साक्षीला टॉयलेट लागल्याने चारचाकी गाडी थांबवली. असता त्यांच्यावर चार जणांनी हल्ला करुन जबर मारहाण केली होती.
यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. माढ्यातून सोलापूरला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. घटना समजताच माढा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवराम बोटे, एस. एस. घोळवे, शब्बीर शेख यांनी तत्परतेने घटना स्थळी जाऊन मुलगी साक्षीला घटना विचारली असता तिने उपस्थितांना व माढा पोलिसांना हकीकत सांगितली.
मात्र चौकशीसाठी माढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बि.एस. खणदाळे यांनी घेतले असता त्यांनाही व्यवस्थित उत्तरे न देता साक्षी घूमजाव करीत दिशाभूल करीत होती. अखेर पोलिसी खाकी दाखवताच साक्षी व तिचा प्रियकर चैतन्य याने गुन्ह्याची कबूली दिली.
बार्शी विभागाचे उपविभागीय अधिकारी जे. एस. नालकुल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन तपासाची चक्रे फिरवली. पोलिस निरीक्षक बी. एस. खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक मोहम्मद शेख घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
साक्षी एमबीए करते तर चैतन्यचे माढ्यात दुकान
साक्षी व चैतन्यचे ओळखीतून प्रेम झाले. फोनवर बोलणे, संदेश पाठवण्यातून त्यांची जवळीक वाढली. साक्षी ही बारामती येथे एमबीएचे शिक्षण घेत आहे तर प्रियकर चैतन्य याचे माढ्यात केकचे दुकान आहे. दोघांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. आठ दिवसांपासून तू लग्नासाठी काय करतच नाहीस म्हणून साक्षी चौतन्यवर ओरडायची. वडिलांचा विरोध होईल म्हणून दोघांनी कट रचून शहा यांच्यावर हल्ला केला.
चौघांना दिले प्रत्येकी १५ हजार रुपये
वडिलांना मारण्यासाठी साक्षीने चौघा आरोपींना प्रत्येकी १५ हजार दिले होते. चैतन्य याने गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी व जेवण्यासाठी मारेकऱ्यांना पैसे दिले होते. शेटफळहून माढ्याकडे वडिलांसोबत जात असताना साक्षीने चैतन्यशी ठरल्यानुसार कृती केली.
लघुशंकेचे निमित्त करून गाडी थांबवली
शेटफळहून माढ्याकडे येत असताना वडाचीवाडी गावाजवळ येताच लघुशंकेचे निमित्त करून वडिलांना गाडी थांबवण्यास सांगितले. त्यावेळी पाळतीवर असलेल्या मारेकऱ्यांनी मागून येऊन हल्ला केला.
वडिलांना मारताना मुलगी पाहात राहिली
वडिलांना चौघे मारेकरी मारत असताना पोटची मुलगी निर्विकारपणे पाहत राहिली. मारेकऱ्यांनी पहिल्यांदा पायावर मारहाण केली. त्यानंतर डोक्यात मारल्याने शहा रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले. तेव्हा मारेकरी पळून गेले. हे सर्व साक्षी पाहात होती.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज