टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात 31 डिसेंबरला निरोप देण्यासाठी व नविन वर्षाच्या स्वागतप्रसंगी वाहनचालकांनो दारू पिऊन वाहन चालवाल तर खबरदार, दारू पिणार्या चालकांची ब्रेथ ऑनलायझर मशिनव्दारे तपासणी करून त्यांच्यावर वाहतूक शाखेचे पोलिस खटले दाखल करणार आहेत,
दरम्यान मदयपान करणार्यांच्या तपासणीसाठी सोलापूरहून नविन मशिन मंगळवेढा पोलिस ठाण्यास प्राप्त झाली आहे.
आज 31 डिसेंबर 2022 ला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हॉटेल, ढाबे सज्ज झाले असून येथे विदयुत रोषणाई करून ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे.
येथे मोठया प्रमाणात दारू विक्री होण्याची शक्यता लक्षात घेवून पोलिसांनी त्यांच्यावर निर्बंध घालून त्यांना नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, उत्साहाच्या भरात अनेक वाहनचालक रात्री दारूसेवन करून वाहने चालविण्याची शक्यता नाकारता येत नाही, परिणामी दारूच्या सेवनामुळे अपघाताला निमंत्रण मिळते.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने शुक्रवारी ग्रामसुरक्षा यंत्रणेव्दारे वाहनचालकांना दारू पिऊन वाहने हाकू नका, अपघात टाळा असा महत्वपूर्ण संदेश वाहनचालक व नागरिकांना देवून जनजागृती केली आहे.
मागील आठवडयापासून मंगळवेढा तालुक्यात अपघाताची मालिका सुरु असल्याचे चित्र आहे. यामध्ये जवळपास अर्धा डझन लोकांचा जीव गेला आहे.
पोलिस यंत्रणेने 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मंगळवेढा शहराच्या सोलापूर रोड, सांगोला नाका, खोमनाळ नाका, पंढरपूर रोड आदी ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी राहणार असून मशिनव्दारे मदयपी वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे.
तसेच पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी शहर व ग्रामीण भाग पिंजून गस्त घालणार आहेत. या गस्तीमधून एकही दारू पिवून फिरणारा इसम पोलिसांच्या तावडीतून सुटणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,पोलिस निरिक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाो पिंगळे,अमोल बामणे,सत्यजीत आवटे,अंकुश वाघमोडे,तसेच गोपनीय विभागाचे पोलिस हवालदार गेजगे,पोलिस कॉन्स्टेबल वाघमारे,
वाहतुक शाखेचे पोलिस नाईक शिवाजी पांढरे,पोलिस शिपाई सत्यवान शिंदे आदी लक्ष ठेवून आहेत. नवीन वर्षाचे स्वागत शांततेत करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज